breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ई’ स्कूटरचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ट्रायल बेसेसवर पहिल्या टप्प्यात २० ‘ई-स्कुटर’चे नियोजन केले होते. त्याचे आज छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी पुन्हा एक पाऊल ‘स्मार्ट सिटी’कडे वळवत ‘ग्रीन सौदागर’ क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे हिरो कंपनीची लीप ‘इ-स्कुटर’ सेवा आज पासुन कार्यरत करण्यात आली आहे. ही ‘ई-स्कुटर’ Android App द्वारे चालु किंवा बंद करता येते. ही स्कुटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा फुल्ल चार्ज केल्यावर ६० किलो मीटर चालवता येते. ह्या ‘ई-स्कुटर’ला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात. ‘इ-स्कुटर’ची टॉप स्पीड ही २५ किलो मिटर प्रति तास आहे.

‘ई-स्कुटर’ चालवण्यासाठी पाहिले १५ मिनीट राईड फ्री असणार आहे. त्यानंतर ‘ई-स्कुटर’ चालवण्यासाठी १.५० रुपये पर मिनिट आहे. पैसे पेड करण्यासाठी UPI अप्स द्वारे पैसे पेड करून ई-स्कुटरचा आनंद नागरिकांना घेता येईल. पिंपळे सौदागरमधील नागरिकांचे स्वास्थ व आरोग्याची काळजी घेत अनेक ठिकाणी पेडल सायकल पॉईंट केले आहेत. त्याच ठिकाणी ‘ई-स्कुटर’ पॉईंट आणि ‘ई-स्कुटर’ चार्जिंग पॉईंट आहेत.

यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथ काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, चंदा भिसे, भानुदास काटे, शंकर काटे, दत्तोबा काटे, शेखर कुटे, प्रकाश झिंजुर्डे, पोपट काटे, विशाल शिंदे, राहुल सरोदे, विकास काटे, संजय भिसे, प्रविण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, नितीन कुंजीर, अमोल थोरात, दिपक गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button