breaking-newsराष्ट्रिय

‘बॅटमॅन’ आमदाराला जामीन मिळताच समर्थकांचा भाजपा कार्यालयाबाहेर गोळीबार

महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना शनिवारीच जामीन मंजुर झाला होता, पण रविवारी त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. स्थानीक तुरूंग प्रशासनाला न्यायालयाचे आदेश वेळेवर न मिळाल्याने आकाश विजयवर्गीय यांना चौथी रात्रही तुरूंगातच काढावी लागली. आज सकाळी 10 वाजता तुरंगातून त्यांची सूटका करण्यात येणार होती, कार्यकर्त्यांनी यासाठी खास योजनाही बनवली होती. पण कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तुरूंग आणि जिल्हा प्रशासनाने आकाश यांची तुरूंगातून ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर सुटका केली.

दरम्यान, आकाश यांना जामीन मंजुर झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांचे समर्थक खुलेआम गोळीबार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. यावेळी विजयवर्गीय यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजुर केल्याचं समजताच विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी एक जण हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

Embedded video

ANI

@ANI

Madhya Pradesh: Celebratory firing outside BJP MLA Akash Vijayvargiya’s office in Indore after he got bail in an assault case. (29-06)

445 people are talking about this

इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटने मारहाण केल्यामुळे आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button