breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

उ. प्रदेशात भाजपाचा जाहीरनामा : विद्यार्थिनिंना स्कूटी तर विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार

लखनौ | टीम ऑनलाइन
उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने मंगळवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे तिघेही यावेळी उपस्थित होते.

या जाहीरनाम्याचे नाव ‘लोक कल्याण संकल्प पत्र’ असे ठेवले आहे. उ. प्रदेशात निरनिराळ्या भागात जाऊन यावर मते घेतली असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थिनींना स्कूटी आणि विद्यार्थ्यांना लॉपटॉप देण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी भाषणात सांगितले. तसेच उज्ज्वला योजेनतंर्गत तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. छोट्या शेतकऱ्यांना दुप्पट कृषी सन्मान निधी देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

तर योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला आहे. आज राज्यात कायद्याचे राज्य आहे. मुली, महिला राज्यात स्वताला सुरक्षित समजत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आधीच्या सरकारांच्या काळात राज्यात दंगली होत होत्या. दरमहिन्याला संचारबंदी लागू करावी लागत होती. मुली शाळेत जाऊ शकत नव्हत्या. आता मात्र हे चित्र बदलले असल्याचे योगी म्हणाले. उ. प्रदेशात आता संचारबंदी करावी लागत नाही, मुली बिनघोर शाळेत जाऊ शकतात अस त्यांनीं सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button