breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप म्हणजे घोषणांचा बाजारच – अशोक चव्हाण

कऱ्हाड  –  भारतीय जनता पक्ष म्हणजे घोषणांचा बाजारच आहे. भाजप सरकार सामाजिक, आर्थिक, कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे सामान्य जनतेत असंतोष आहे. त्या सामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच जनसंघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.

काँग्रसेची जनसंघर्ष यात्रा काल रात्री येथे आली. त्यावेळी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जाहीर सभा झाली. त्यात चव्हाण बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बंटी उर्फ सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, आमदार जयकुमार गोरे, आमदार विश्वजीत कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आमदार आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थीत होते.

चव्हाण म्हणाले, संस्था पोखरणे, विचारसरणी लादणे, समाजहीताचे विचार संपवणे अशा प्रकारचे काम सध्याचे सरकार करत आहे. किती खोटे बोलावे याच्या मर्यादा भाजप सरकारने ओलांडल्या आहेत. कोण किती खोटे बोलतो हेच त्यांचे त्यांना कळेना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सामान्य आता एकवटू लागले आहेत. देश व राज्यातही भाजप सरकारमुळे मोठी कठीण स्थिती निर्माण झाली आहे. सामाजिक पातळीवरील वातावरण दुभंगून ठेवून विचारांना संपवणाऱ्या भाजप सरकारला नक्की काय साध्य करायचे ते आता सगळ्यांनी ओळखले आहे. ज्यांना अटक करायची त्यांचा सन्मान करणाऱ्या व ज्यांचा सन्मान करायचा त्यांना अटक करणारे विचार वाढत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यास सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. इव्हीएम मशीनच्या जीवावर सत्ता आणणाऱ्या भाजपने बॅलेट पेपवर (मतपत्रिकेवर) निवडणुकांना सामोरे जावून विजय मिळवून दाखवावा. ते शक्य नसल्यानेच त्यांना त्याची भिती वाटते आहे.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार आनंदराव पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, आमदार अमरजीत काळे, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह अनेक वक्त्यांची भाषणे झाली. अॅड. संभाजी मोहिते यांनी सुत्रसंचालन केले. मनोहर शिंदे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button