breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

आंदोलन / बँकांचे होत असलेल्या विलीनीकरणाला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध; आज देशव्यापी संप

मुंबई – बँक विलीनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाने विरोध दर्शवला तर डाव्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकांचे होत असणारे विलीनीकरण आणि बँकांनी घटवलेले व्याजदर या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

या बँकांचे होणार विलीनीकरण

केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेत, सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत तसेच आंध्रा बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण होणार आहे.

या संघटनांनी दर्शवला विरोध

परंतु महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी या विलीनीकरणाला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बँक कर्मचारी धरणं आंदोलन करणार आहे. यापूर्वी दोन वेळा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आंदोलन, संप पुकारून या विलीनीकरणाचा निषेध नोंदवला आहे.

या आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये बँकांचे विलीनीकरण होऊ नये या प्रमुख मागणीसह पुढील मागण्या आहेत.

> सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा आठवडा करावा.

> रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी.

आरबीआयच्या नियमांनुसार निवृत्तीवेतन द्यावे.

> बँकांमध्ये नोकरभरती करावी.

> एनपीएस रद्द करावा.

> ग्राहकांसाठीच्या सेवा शुल्कात कपात करावी.

> वेतन आणि पगारात बदल करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button