breaking-newsराष्ट्रिय

भाजप नेते वसीम बारी यांची हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथे अतिरेक्यांनी भाजप नेते वसीम बारी यांची हत्या केली. अतिरेक्यांनी बुधवारी (8 जुलै) रात्री वसीम यांच्या बंदीपोऱ्यातील दुकानाजवळ जाऊन बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वसीम यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर सुल्तान यांचादेखील मृत्यू झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली. ही घटना बुधवारी (8 जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली .

वसीम बारी यांचं बंदीपोरामध्ये दुकान आहे. दुकानाजवळच त्यांचं घरदेखील आहे. बुधवारी (8 जुलै) रात्री ते वडील आणि भावासोबत दुकानात होते. यावेळी अतिरेक्यांनी दुकानाबाहेर घेराव घातला. दुकानात वसीम यांच्यासोबत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. याच संधीचा फायदा घेत अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात वसीम, त्यांचे वडील आणि भाऊ यांचा मृत्यू झाला.वसीम यांच्या सुरक्षेसाठी 8 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र, अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा घटनास्थळी एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button