breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या दोन निष्ठावंत युवा कार्य़कर्त्यांना प्रदेशात संधी

देवयानी भिंगारकर, अजित कुलथे यांची भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी वर्णी

पिंपरी | प्रतिनिधी

भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी देवयानी भिंगारकर व अजित कुलथे यांची निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी निवडीची घोषणा करून पत्र दिले आहे. भिंगारकर आणि कुलथे हे दोघेही संघ परिवाराशी संबधिंत असून पक्षाचे निष्ठावंत कार्य़कर्ते आहेत.

देवयानी भिंगारकर-सोमन यांनी महाविद्यालयीन जीवनात २००८ ते २०१२ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी असताना विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींचे प्रश्न सातत्याने मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला. फर्ग्युसनमध्ये ढोलताशा पथकाची स्थापना केली. पिंपरी-चिंचवडमध्ये गणराज्य ढोलताशा पथक उभारले आहे. २०१३ पासून भाजयुमोच्या माध्यमातून सक्रिय आहेत. त्यांनी युवती आघाडी अध्यक्ष, २०१६ ते २०२० जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

तर अजित कुलथे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघ स्वयंसेवक म्हणून काम केले. २००७ साली महापालिका निवडणूकीत स्लिपवाटप पासून, राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम केले. २००७ साली युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष , व्यापारी आघाडी युवा मोर्चा शहराध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस या पदांवर निष्ठेने काम केले आहे. चिंचवडगाव व्यापारी संघटनेच्या सरचिटणील पदाची जबाबदारी सांभाळताना अनेक व्यापारी आंदोलन करून, पुढाकार घेतला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. अशी विविध उपक्रमातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button