breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचे सुब्रमन्यम स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार राहूल गांधी यांच्या बाबत भाजपचे सुब्रमन्यम स्वामी यांनी वैयक्तिक बदनामीकारक व खोटे वक्तव्य केल्याने पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या पदाधीका-यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 12) अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजपचे सुब्रमन्यम स्वामी यांनी केलेले वक्तव्य सामाजिक माध्यामातून प्रसारीत झाले आहे. देशाभरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांना निवेदन देऊन स्वामी यांच्यावर भारतीय दंडविधान क्रं. ४९९ व ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र एनएसयुआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे व पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव आदिचां सहभाग होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button