breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नारायण राणे मुलासंदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकून संतापले अन् म्हणाले, “मुर्ख माणूस समजलात का तुम्ही मला?”

मुंबई |

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील झालेल्या हल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांचं नाव समोर आलं असल्याने त्यांच्यावर अटकेची टांगली तलवार आहे. नितेश राणे यांनी याप्रकरणी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जदेखील केलाय. या अर्जावर सुनाणी होण्याआधीच नितेश राणेंचे वडील आणि केंद्रीय मंत्रीत नारायण राणेंनी आज कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी नारायण राणेंना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे ते पत्रकारावर चांगलेच संतापल्याचं चित्र दिसून आलं.

  • काय होता प्रश्न?

झालं असं की नारायण राणेंनी नितेश राणे यांचं नाव संतोष परब मारहाण प्रकरणामध्ये समोर आल्यानंतर नागपूर दौरा अर्ध्यात सोडून कणकवली गाठलं. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने थेट, “नितेश राणे कुठे आहेत?”, असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर नारायण राणे चांगलेच संतापल्याचं चित्र पहायला मिळालं.

  • …मुर्ख माणूस समजलात का?

“असा प्रश्न असतो? कुठे आहेत सांगायला काय मुर्ख माणूस समजलात का तुम्ही मला?,” असा प्रतिप्रश्न राणे यांनी संतापून पत्रकाराला विचारला. पुढे बोलताना, “कुठे आहेत हे जरी मला माहिती असलं तरी मी सांगणार नाही. तुम्हाला मी हे का सांगावं?,” असंही नारायण राणे म्हणाले. ज्यांनी नितेश यांना खोट्या प्रकरणामध्ये गोवलं आहे त्यांना नितेश राणे कुठे आहेत हे विचारावं, असा टोलाही नारायण राणेंनी लागावला.

  • म्याँव म्याँव प्रकरणावरही केलं भाष्य…

“विधिमंडळात नितेशनं म्याँव म्याँव केलेलं नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची काय हरकत आहे. मांजराचा आवाज कोण काढतं की ज्यामुळे संताप झाला? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? त्याच वेळी कुणी अजून कसला आवाज काढला असता, तर ते तसेच आहेत का? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा?” असा सवाल नारायण राणेंनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

  • कोण अजित पवार?

पत्रकारांनी अजित पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेविषयी विचारणा केली असता नारायण राणेंनी त्यावर निशाणा साधला. “कोण अजित पवार? मी ओळखत नाही अजित पवारांना. राज्यातल्या लोकांच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्याबाबत संदर्भ का देत नाहीत तुम्ही?”, असा उलट प्रश्न त्यांनी अजित पवारांना केला.

  • ही काय भाषा आहे पोलिसांची?

“उजव्या बाजूला खरचटल्यामुळे ३०७ (ची केस) लागते हे मी पहिल्यांदाच पाहिलं. ब्रेन, हार्ट अशा ठिकाणी मारल्यानंतर मृत्यू होईल अशी काही मारहाण झाली, तर तिथे ३०७ लागते. पोलीस हॉस्पिटलला गेले. तिथे रुग्ण असतात. तिथे माझी पत्नीही बसली होती. हे उघडून द्या, दे उघडून द्या, ही काय भाषा आहे पोलिसांची? कुणाचं हॉस्पिटल आहे? कुणाच्या पत्नीसोबत तुम्ही बोलताय?”, असे अनेक प्रश्न नारायण राणेंनी या तपासासंदर्भात उपस्थित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button