breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, आईसह चार महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

वर्धा – दुचाकीला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक लागल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीवरील आई आणि ४ महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर, मुलाचे वडील गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा अपघात वर्ध्यातील सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावरील सैनिकी ढाब्यासमोर घडला आहे. शीतल भूषण सावध (29) आणि अंशू भूषण सावध (4 महिने) अशी मृतांची नावं आहेत. तर जखमी असलेल्या पती भूषण सावध यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूषण सावध आपल्या पत्नी आणि मुलासह दुचाकीने सावंगीकडून मांडवा येथे घरी जात होते. दरम्यान, सैनिक ढाब्याजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमुळे ती दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली.

या अपघातात शितल सावध आणि मुलगा अंशू सावध यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर भूषण सावध यांना गंभीर दुखापत झाली आहे. यातील मृत महिला ही सैन्यात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button