breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भयानक! चोरीचा आळ घेऊन दलित तरुणांना अमानूष मारहाण, प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकल्याचा प्रकार…

जातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे भयानक रूप राजस्थानमध्ये दिसून आले आहे. येथील नागौरमध्ये  चोरीच्या आरोपाखाली दोन दलित तरुणांना अमानूष मारहाण करून त्यांच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. या मारहाणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या घटनेतील दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी राजस्थान सरकारला केली आहे. 

 सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा सर्व प्रकार समोर आला. या व्हिडीओमध्ये दोन तरुण स्वत:च्या बचावासाठी गयावया करत आहेत. तसेच मारहाण करणाऱ्यांची माफी मागत आहेत. मात्र आरोपींकडून कुठलीही दयामाया न दाखवता त्यांना मारहाण करण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातीली पांचौडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. येथील करणू सर्विस सेंटरमध्ये चोरी केल्याचा आरोप दोन तरुणांवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सर्विस सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी या तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 7 जणांचा समावेश असून, यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नागौरचे एएसपी राजकुमार आणि डीएसपी मुकुल शर्मा करत आहेत.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button