breaking-newsराष्ट्रिय

भगत सिंग यांना दहशतवादी म्हणणारा प्राध्यापक निलंबित

वर्गात शिकवताना महान स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग यांचा दहशतवादी असा उल्लेख करणारे जम्मू-विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक ताजुद्दीन यांना निलंबित करण्यात आले आहे. ते पॉलिटिकल सायन्स विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना त्यांनी भगत सिंग यांचा दहशतवादी असा उल्लेख केला. आपण भगत सिंग यांच्याकडे हिरो म्हणून पाहतो पण त्यांच्याकडे दहशतवादी म्हणून सुद्धा पाहिले जात होते असे ताजुद्दीन म्हणाले.

ANI

@ANI

Prof. Mohammad Tajuddin, University of Jammu, on complaint lodged against him in Univ. for calling Bhagat Singh ‘terrorist’: I also consider Bhagat Singh a revolutionary. He is one of the people who sacrificed their lives for the country. 1/2

20 people are talking about this

ताजुद्दीन यांचे हे विधान विद्यार्थ्यांना अजिबात पटले नाही. ताजुद्दीन यांच्या विधानाने भावना दुखावल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार नोंदवली. ताजुद्दीन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी सुद्धा मागितली पण प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे दिसताच त्यांना विद्यापीठाने निलंबित केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती बनवण्यात आली असून आठवडयाभरात ही समिती आपला अहवाल सादर करेल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

ANI

@ANI

I was teaching Lenin (Russian revolutionary) & in that context, I said state calls any violence against it ‘terrorism’. Someone took a 25-second video out of my 2-hrs lecture. Terrorist word came in that,it wasn’t what I meant. Still,if anyone is hurt,I’m really sorry for it. 2/2

16 people are talking about this

मी सुद्धा भगत सिंग यांच्याकडे क्रांतीकारी म्हणून पाहतो. त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. लेनिनच्या रशियन क्रांतीसंदर्भात शिकवत असताना देशाविरुद्ध केलेल्या कुठल्याही हिंसाचाराकडे दहशतवाद म्हणून पाहिले जाते असे मी म्हणालो. दोन तासाच्या लेक्चरमधून कोणीतरी फक्त २५ सेकंदाचा व्हिडिओ बनवला. दहशतवादी या शब्दाचा उल्लेख मी त्या संदर्भात केला होता. माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे ताजुद्दीन म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button