breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भक्ती-शक्ती उड्डाणपुलांच्या उद्घाटनावरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद

पिंपरी |महाईन्यूज|

निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनावरून राजकारण रंगले आहे. या पुलाचे सत्ताधारी भाजपच्या महापौर माई ढोरे यांनी आज (गुरुवारी दि.10) उद्‌घाटन केले. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे हस्ते (बुधवारी दि. 9) उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरुन श्रेय लाटण्यासाठी रस्सीखेच लागली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. उड्डाणपूल सुरू करण्याबाबत अनेकांनी महापौरांना निवेदन दिले होते. आता उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई महामार्गाचे दोन्ही बाजूंच्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता वळसा घालण्याची गरज राहणार नाही.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्‌घाटन उरकून आज उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘शहराचा विकास राष्ट्रवादीच्या काळात झाला आहे. त्यामुळे कोणीही श्रेय लाटू नये.’ यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

तर महापाैर माई ढोरे यांचे हस्ते आज (गुरुवारी) उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, शैलजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य अमित गावडे, आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button