breaking-newsआंतरराष्टीय

ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या विरोधात निघाला सर्वात मोठा निदर्शन मोर्चा

लंडन – लंडनच्या ट्रेफलर स्क्वेअर येथे नुकतेच लॉकडाऊन, मास्क आणि लसीकरणाला विरोध करण्यासाठी १० हजारांहून अधिक लोक एकत्र आले होते. नव्या नियमानुसार एका वेळी ३० हून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी असताना येथे निदर्शने करत १० डाऊनिंग स्ट्रीटपर्यंत (पंतप्रधानांचे निवासस्थान) मोर्चाही काढण्यात आला. हा लॉकडाऊनच्या विरोधात निघालेला सर्वात मोठा मोर्चा होता, असा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मोर्चात बहुतांश लोकांनी मास्क घातलेले नव्हते. शिवाय डिस्टन्सिंगचेही पालन केले नव्हते.

कोरोनामुळे लावण्यात आलेेल निर्बंध तत्काळ मागे घ्यावेत, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती. सरकार महामारीच्या नावाखाली घोटाळे करत असल्याचा आरोपही या लोकांनी केला. दरम्यान, या प्रचंड गर्दीबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे एकूण ३,३२,७५२ रुग्ण असून आतापर्यंत ४१ हजार ४९८ लोकांचा मृत्यू झाला. रोज सरासरी ११०० रुग्ण आढळत आहेत.

विद्यापीठे बंदच राहणार
पुढील महिन्यात विद्यापीठे उघडण्याची योजना ब्रिटन सरकारने तूर्त स्थगित केली आहे. सर्व अभ्यासक्रम आता ऑनलाईनच पूर्ण केले जाणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हा मोर्चा काढल्याने विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बिन यांचे बंधू पीअर्स यांना अटक करण्यात आली. त्यांच्या पुढाकारातूनच हे लोक जमल्याचा आरोप आहे. ५-जी हे पण कोरोनाचे कारण असल्याचे पीअर्स यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button