breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन प्रकार, शहरे पुन्हा होणार लॉकडाऊन

लंडन – एकीकडे ब्रिटनमध्ये कोरोनावर प्रतिबंध म्हणून लसीकरणाला सुरुवात झाली असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे. तिथं वाढणारे कोरोनाचे रुग्ण हे नव्या प्रकारच्या विषाणूचे आहेत. या नव्या विषाणूमुळे ब्रिटनसहीत युरीपीयन देशात पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जातोय. त्यामुळे लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनचे कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हैंकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांना दिलेल्या माहितीमध्ये या नव्या विषाणूमुळे अवघ्या सात दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे तातडीने आणि अत्यंत महत्वाचे कठोर निर्णय घेणं गरजेचे असल्याचं सांगत लॉकडाउनच्या नवीन निर्बंधांची घोषणा मॅट यांनी केली. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तिसऱ्या स्तरावरील लॉकडाउनचे निर्बंध लावण्यात येणार आहेत. म्हणजेच या भागांमध्ये जवळजवळ सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात येणार आहेत. “ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आहे. इंग्लंडच्या आग्नेय भागामध्ये रुग्णसंख्या वाढीमध्ये हेच मुख्य कारण असल्याची शक्यता आहे,” असंही मॅट म्हणाले आहेत. अशाप्रकारच्या नवीन करोना विषाणूचा संसर्ग झालेले एक हजार रुग्ण आढळून आलेत असंही मॅट यांनी स्पष्ट केलं.

ब्रिटनमध्ये आरोग्य केंद्रांवर सोमवारपासून फाइजर/बायोएनटेकच्या कोरोना लसींचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. याच आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. सर्वाआधी वयस्कर व्यक्ती त्यानंतर पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएसने) दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये शंभरहून अधिक केंद्रांवर करोनाच्या लसींचा पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी सोमवारीच कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी लसीकरणाला आजपासून (१५ डिसेंबर २०२० पासून) सुरुवात होणार आहे.

एनएचएसच्या प्राथमिक आरोग्य निरिक्षण निर्देशक असणाऱ्या डॉ. निक्की कनानी यांनी, “डॉक्टर, नर्स, औषध विक्रेते आणि अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी करोनावरील लसी देण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत,” असं सांगितलं. एनएचएसच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, असंही कनानी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button