breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेच्या बैठकीत नगरसेविकेचा खळबळजनक आरोप; उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे लक्ष

चिपळूण : मी निवडून आल्यावर मला बाद करण्यासाठी जे राष्ट्रवादीत प्रवेश करता करता थांबले, त्या सो कॉल्ड शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मला बाद करण्यासाठी माझा एकटीचाच निवडणूकीचा हिशेब सबमिट केला नाही व मला अपात्र करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, असा धक्कादायक आरोप नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी चिपळूण येथील पक्षाच्या बैठकीत केला. त्यांच्या या आरोपामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. (shiv sena corporator shivani khanvilkar made serious allegation)

दापोली नगरपंचायतीत शिवसेनेच्या निवडून आलेल्या खानविलकर या सगळ्यात कमी वयाच्या नगरसेविका आहेत. शिवसेनेच्या उत्तर रत्नागिरी विभागाच्या चिपळूण संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत अलिकडेच झालेल्या बैठकीत शिवानी खानविलकर यांनी अन्यायाचा पाढाच वाचला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून शिवानी खानविलकर या सगळ्यात युवा असलेल्या नगरसेविकेला पक्षाचे नेते नेमका कोणता न्याय देतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे.

खानविलकर आरोप करताना म्हणाल्या की, जे चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार होते, त्यांच्याच हातात अचानक शिवसेनेची नगरपंचायत निवडणूकीची सूत्रे गेली. तेच ऋषी गुजर, किशोर देसाई मला शिवसेना काय हे सांगतात. आमचे पूर्ण घराणे शिवसेनेचे काम करतो. मी अक्कल आल्यापासून शिवसेनेचीच आहे. माझी चूक काय, तर आमचे विद्यमान आमदार जे शिवसेनेचेच आहेत त्या आमदार योगेश कदम यांना भेटले म्हणून! त्यामुळे पक्षविरोधी काम केले असे ते सांगतात. सूर्यकांत दळवी, किशोर देसाई, ऋषि गुजर यांनीच मला डावलले, असा घणाघाती आरोप दापोली नगरपंचायत निवडणूकीत निवडून आलेली शिवानी खानविलकर यांनी बैठकीत केला.

नगराध्यक्ष निवडणुकीतही मी इच्छुक होते. मी कट्टर शिवसैनिक आहे. पण मला गटाच्या बैठकीत डावलण्यात आले. तुला आमच्या सोबत पुढची पाच वर्षे काम करायचे आहे अशी थेट धमकीच मला देण्यात आली, असा खळबळजनक आरोप नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी बैठकीत आपली कैफियत सांगताना केला आहे. शिवसेनेच्या निवडून आलेल्या सहा नगरसेवकांपैकी आपणच फक्त पहिल्यापासून कट्टर शिवसेनेच्या आहोत. बाकी सगळे बाहेरून आलेले आहेत, असाही थेट आरोप या बैठकीत नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी पक्षाच्या बैठकीत केला होता.

या निवडणुकीतआमदार योगेश कदम यांनाही पालकमंत्री अनिल परब यांनी दूर ठेवले होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्षविरोधी काम करतात त्यांच्यावर कारवाई करवी असा ठराव तालुका कार्यकारिणीने करून पक्षनेत्यांकडे पाठवला होता. त्याच सूर्यकांत दळवी गटाला पालकमंत्री अनिल परब यांनी नगरपंचायत निवडणुकीत बळ दिले. तेव्हापासून रामदास कदम हे नाराज होते. त्यानंतर पालकमंत्री अनिल परब व रामदास कदम यांच्यातील वाद महाराष्ट्राने पाहिला. पण त्यानंतर संजय राऊत यांची रामदासभाई कदम यांनी भेट घेतली होती. तेव्हापासून कदम यांच्यावर असलेली नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button