breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियाडवाला एनसीबी कार्यालयात दाखल

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)कडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर एनसीबीकडून त्यांनाही समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आज फिरोज नाडियाडवाला हे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ड्रग्ज प्रकरणात रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकले होते. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घराचाही समावेश होता. एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडल्यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने रविवारी अटक केलेले चार तस्कर आणि शबाना सईद यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button