breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानांनीही केले भारतीय संघाचे कौतुक, म्हणाले…

नवी दिल्ली – ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५ नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ब्रिस्बेन कसोटीनंतर ट्विट करून भारतीय संघाची तारीफ केली.

वाचा :-IND vs AUS 4th test : ब्रिस्बेन कसोटी भारताने जिंकली, बॉर्डर-गावस्कर मालिकाही खिशात

पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाने आम्हाला अत्यानंद झाला आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडूंमधील उर्जा आणि उमेद प्रकर्षाने दिसून आली. भारतीय खेळाडूंनी दाखविलेला दृढनिश्चय, धैर्य आणि त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. भारतीय संघाचे अभिनंदन, भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.’

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ गड्यांनी विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयमाने फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. तर चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button