breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बेस्टच्या चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, प्रसांगवधान राखून चालकाने वाचवले प्रवाशांचे प्राण

मुंबई – हृदयविकाराचा झटका आलेला असतानाही बेस्टच्या चालकाने बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. बेस्ट बस भरधाव वेगात असतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र याही परिस्थितीत चालकाने प्रसांगवधान राखून गाडीचा वेग कमी केला आणि गाडी बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी सिग्नलच्या बाजूला असलेल्या भाजीच्या दुकानात शिरली आणि सिग्नलला धडक लागून बस थांबली.सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. तर बस चालकाची प्रकृतीही स्थिर आहे.

घाटकोपरवरुन टाटा पॉवर हाऊस, चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या 381 क्रमांकाच्या बसला आज सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी हा अपघात झाला आहे. चेंबूर पोलीस स्टेशनसमोर बसंत पार्क इथे हा अपघात झाला आहे. बस चालक हरिदास पाटील यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर त्यांचा बसवरील ताबा सुटला. परंतु बसमधील प्रवाशांना सुरक्षेचा विचार करत त्यांनी प्रसंगावधान दाखवलं. बसचा वेग कमी करुन ती बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली आणि बसंत पार्कच्या सिग्नलला धडकून थांबली. सुदैवाने प्रवाशांमध्ये कोणालाही इजा झाली नाही.

या बसमध्ये एकूण नऊ प्रवासी होते, त्यापैकी एक जण पोलीस कर्मचारी होता. त्यांनीच पोलिसांची गाडी मागवून चालक हरिदास पाटील यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button