breaking-newsक्रिडा

बुद्धिबळ स्पर्धा: महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीला विजेतेपद

  • कोल्हापूरच्या सम्मेद शेटेला दुसरा क्रमांक
  • श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा

पुणे- महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने स्पर्धेत आपली आघाडी कायम ठेवत 8 गुणांसह अव्वल क्रमांकासह बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत सहाव्या मानांकीत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने तामिळनाडूच्या हरिकृष्णन ए.आरएला बरोबरीत रोखले. 36 वर्षीय विक्रमादित्यने रिव्हर्स बेनॉनी पध्दतीने सुरूवात करत हरिकृष्णनला 30 चालींमध्ये बरोबरीत रोखले. कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याने सीआरएसबीच्या एजीएम किरण पंडीतरावचा पराभव करून 7.5 गुणांसह व 43.00 बुकोल्स कट गुण सरासरीच्या आधारावर दुसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या इंद्रजीत महिंद्रकर व आयएम समीर काठमळे यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीला 1 लाख रुपये व करंडक, तर उपविजेत्या सम्मेद शेटेला 60,000 रुपये व करंडक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माधुरी सहस्त्रबुद्धे, अध्यक्षा, विधी समिती, पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयसन प्रॉपर्टीजचे मंदार देवगावकर, पीडीसीसीचे सचिव राजेंद्र कोंडे, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, नितीन शेणवी, विनिता शोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकालः आठवी फेरीः (व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार)ः
हरिकृष्णन ए.आरए (तामिळनाडू) (7गुण) बरोबरी वि. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (महा) (8गुण);
इंद्रजीत महिंद्रकर (महा) (7.5गुण) वि.वि. आयएम अभिषेक केळकर (सीआरएसबी) (6.5गुण);
आयएम समीर काठमळे (महा) (7.5गुण) वि.वि. एफएम मट्टा विजय कुमार (आंध्रप्रदेश) (6.5गुण) एजीएम किरण पंडीतराव (सीआरएसबी) (6.5गुण) पराभूत वि. सम्मेद शेटे (महा) (7.5गुण);
कपिल लोहाना (महा) (6गुण) पराभूत वि. ग्रॅंडमास्टर सुंदराराजन किदांबी (तामिळनाडू) (7गुण)
मुथय्या एएल (तामिळनाडू) (7गुण) वि.वि. अतुल डहाळे (महा) (6गुण);
एफएम अमेय ऑडी (गोवा) (7गुण) वि.वि. दिगंबर जाईल (महा) (6गुण)
एफएम सोहन फडके (महा) (6.5गुण) बरोबरी वि. ऋत्वीज परब (गोवा) (6.5गुण);
डब्ल्युआयएम चंद्रेयी हजरा (पश्‍चिम बंगाल) (6गुण) पराभूत वि. आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु (ओडिसा) (6.5गुण);
प्रणित कोठारी (महा) (5.5गुण) पराभूत वि. आयएम रत्नाकरन के (रेल्वे) (6.5गुण).

इतर पारितोषिके:
बेस्ट बिलो 1400 ते 1600:
1. रोहित मोकाशी
2. स्नेहल महाजन
3. वरुण देशमुख

बेस्ट बिलो 1200 ते 1399:
1. ओम लामकाने
2. सेरा डागरिया
3. कौस्तुभ म्हस्केपाटील

बेस्ट बिलो 1000 ते 1199:
1. कुशाग्रा जैन
2. वसुधारिणी केसवन
3. हिमांशू किंगर

बेस्ट अनरेटेड खेळाडू
1. अंशूल गुप्ता
2. प्रथमेश शेरला
3. मिहीर वैशंपायन

बेस्ट प्रौढ खेळाडू:
1. एफएम एसजी जोशी
2. गिरीश जोशी

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू
1. तनिशा बोरमणिकर
2. डब्लूआयएम चंद्रयी हाजरा

14 वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू:
1. निर्गुण केवल
2. पृथु देशपांडे

12 वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू:
1. ऑगस्तिया नेगी
2. एएफएम अर्णव नेहेटे

10 वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू:
1. अर्णव नानल
2. आर्यन सिंगला

8 वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू:
1. युवराज पाटील
2. हितांश जैन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button