breaking-newsमहाराष्ट्र

अकोल्यातील “आप’ नेत्याची बुलडाण्यात हत्या

पाच दिवसानंतर बेपत्ता मुकीम अहमद यांचा मित्रासह आढळला मृतदेह 
बुलडाणा – अकोल्यातील “आप’चे नेते मुकीम अहमद यांची हत्या झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अहमद बेपत्ता होते. अखेर बुलडाण्यातील मेहकर तालुक्‍यातील जानेफळ शिवारात अहमद यांचा मृतदेह सापडला. अहमद यांच्यासोबत बेपत्ता असलेले त्यांचे मित्र शफी कादरी यांचाही मृतदेह पोलिसांना सापडला आहे.

गेल्या 30 जुलैपासून मुकीम अहमद बेपत्ता होते. अहमद यांची गाडी 30 जुलैला अकोल्यातील वाशिम बायपास चौक भागात बेवारस आढळून आली होती. मुकीम अहमद आपचे स्थानिक नेते होते. याशिवाय ते माहिती अधिकार कार्यकर्ते होते. अकोला जिल्हा परिषद उर्दू शिक्षक भरतीतील घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. याशिवाय अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुथ्थूकृष्णन शंकरनारायण यांचे कर्णबधिरत्वाचे प्रमाणपत्र काढत यात होणारा भ्रष्टाचार समोर आणला होता.

अहमद बेपत्ता झाल्यानंतर अकोला पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. मात्र, अहमद यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलीस त्याचा तपास घेत आहेत.

अहमद एकेकाळी समाजवादी पक्षाच्या युवक आघाडी असलेल्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर बसप, भारिप असा राजकीय प्रवास त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंहाचे कट्टर समर्थक असलेल अहमद त्यांच्या “लोकमंच’ पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button