breaking-newsमनोरंजन

बीपाशा बासूच्या पहिल्या बिकिनी शूटचा फोटो पाहिलात का?

अभिनेत्री बिपाशा बासू गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. बीपाशा सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करुन तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे चाहत्यांना सांगत असते. नुकताच बीपाशाने तिचे जुने फोटो शेअर केले आहेत.

बीपाशाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पहिल्या बिकिनी शूटचा फोटो शेअर केला आहे. हे फोटोशूट बीपाशाने कॉलेजमध्ये असताना केले आहे. या लूकमध्ये बीपाशा अत्यंत वेगळ्या अंदाज दिसत आहे. या फोटोमध्ये बिपाशा सावळी दिसत असली तरी बॉलिवूडमधील हॉट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

चाहत्यांना बीपाशाचा हा लूक आवडला असून चाहत्यांनी बीपाशावर कमेंटचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांना तर बीपाशाला पून्हा या लूकमध्ये पाहायचे असल्याचे म्हटले आहे. बीपाशा २०१५मध्ये ‘अलोन’ या चित्रपटामध्ये दिसली होती. दरम्यान ती करण सिंग ग्रोवरच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिने करणसह लग्न केले. तेव्हा पासून बीपाशा रुपेरी पडद्यापासून लांब असल्याचे दिसत आहे. आता बीपाशा पुन्हा केव्हा चित्रपटात दिसणार याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button