breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बिजलीनगर अंडरपासच्या वाढीव निधीवर भाजप पदाधिका-याचा डोळा?

सुमारे साडेचार कोटी रुपयाचा वाढीव खर्च; मे. कृष्णाई इन्फ्रा ठेकेदाराची मुदत संपुष्टात

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या वतीने चिंचवडमधील बिजलीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या अंडरपासचे काम रखडलेले आहे. मुदत संपल्यानंतर हे काम सुरू असून अतिरिक्त काम झाल्याचे कारण सांगून या कामासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा वाढीव खर्च करण्यात येत आहे. हा वाढीव खर्चासह सुधारित खर्चाच्या सदस्यपारित ठरावास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.30) मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने प्राधिकरण, बिजलीनगर, चिंचवडगाव,वाल्हेकरवाडी व रेलविहार सोसायटी येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी बिजलीनगरकडून गुरुद्वाराकडे जाणा-या मार्गावर अंडरपास बांधण्यात येत आहे. हा अंडरपासचे काम सुरू असून मे.कृष्णाई इन्फ्रा. प्रा.लि. या ठेकेदाराकडे हे काम आहे. पालिकेने १४ कोटी २५ हजारांचे हे काम काढले होते. कामासाठी २४ महीन्यांची २ मार्च २०२० पर्यंत मुदत होती. मात्र, ही मुदत संपृष्टात आली असून मुदतवाढीमध्ये काम सुरू आहे. तसे असताना रेंगाळलेल्या या कामासाठी आता को्टयवधी रुपयांचा वाढीव खर्च देण्याची तयारी पालिकेकडून सुरू आहे.

वॉटर पाइप खोदकाम, विद्युत केबलसाठीचे खोदकाम वेगवेगळ्या वेळी झाले. या अंडरपासच्या कामासाठी कठीण खडकामध्ये खोदकाम करावे लागले आहे. कठीण खडकात खोदल्यामुळे १ कोटी २४ लाखांची वाढ झाली. यासह बांधकामातील बदल, स्टीलचे वाढलेले दर, अंडरपासच्या भिंतींसाठी टाईल्समध्ये केलेला बदल, विद्युत वाहिनी, जलवाहिनी स्थलांतरीत करणे, मॅनहॉल चेंबर्सचे बांधकाम अशा विविध कारणांसाठी या कामाचा खर्च वाढला आहे. या कामात एकूण ४ कोटी ६६ लाख ४८ हजार ५६३ रुपयांचा खर्च वाढला आहे. मूळ निविदेनुसार १४ कोटी २५ हजारांचे रुपयांचे हे काम आात १८ कोटी ६६ लाख ७४ हजार १८८ रुपयांवर पोहोचले आहे.

महापालिकेच्या कामासाठी तब्बल 4 कोटी 66 लाख रुपये वाढीव खर्च अदा करण्याचा हा विषय आहे. मात्र, हा प्रस्ताव संबधित अधिकारी व आयुक्तांमार्फत स्थायी समितीकडे मान्यतेसाठी आलेला नाही. तर, स्थायी समितीच्या सदस्यांनी आयत्यावेळी तो बैठकीत दाखल केला असून स्थायी समितीने त्यास मान्यताही दिली. त्यामुळे ठेकेदाराला वाढीव खर्च मिळवून देण्याची चिंता प्रशासनापेक्षा स्थायी समितीच्या पदाधिका-यांना अधिक असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button