breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुर्गा टेकडी येथे कायमस्वरूपी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवावी

  • भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांची मागणी
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

दुर्गा टेकडी येथे मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक दररोज येतात. ज्येष्ठ नागरिक व महिलांचा देखील यामध्ये सहभाग असतो. त्यांच्या आरोग्या दृष्टीने याठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा असणे गरजेचे आहे. ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

त्यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, निगडी येथील दुर्गा टेकडी येथे दरदिवशी सुमारे एक हजार नागरिक सकाळी वॉकींगसाठी येतात. शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी ही संख्या दुप्पट असते. सकाळी या ठिकाणी कोणत्याही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.

नुकतेच दैनिक जनशक्ती वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक कुंदन ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने याठिकाणी निधन झाले. त्यांना त्वरित अत्यावश्यक सुविधा मिळाली नाहीत. या अगोदरही अनेक घटना घडल्या आहेत. त्याची दखल घेत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी. एक रुग्णवाहिका व डॉक्टर नियुक्त करावेत, अशी मागणी गोरखे यांनी निवेदनाद्वारे केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button