बिग बी यांनी केली ‘Corona Virus’ वर कविता…
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ”गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचीच चर्चा आहे, यामुळे नुकसान होत आहेत. लोक घरी बसले आहेत, घाबरले आहेत. मलाही कोरोनावर चार पंक्ती सुचल्या आहेत तुम्हाला त्या भेट देण्याचा विचार आला म्हणून शेअर करतोय”, असं म्हणत बच्चन यांनी कोरोनावर त्यांनी रचलेली कविता शेअर केलीये, सोबत व्हिडिओही जोडला आहे.
बिग बी यांची कविता अशी आहे…
“बहुतेरे इलाज बतावें ,जन जनमानस सब ,
केकर सुनैं, केकर नाहीं, कौन बताए इ सब ;
केयु कहिस कलौंजी पीसौ, केयु आँवला रस
केयु कहस घर म बैठो, हिलो न ठस से मस
ईर कहेन औ बीर कहेन, की ऐसा कुछ भी Carona ,
बिन साबुन से हाथ धोई के ,केहू के भैया छुओ न ;
हम कहा चलो हमौ कर देत हैं , जैसन बोलैं सब
आवय देयो , Carona-फिरोना , ठेंगुआ दिखाऊब तब !” ~ अब
अमिताभ बच्चन यांची ही कविता चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.