breaking-newsराष्ट्रिय

बालाकोट हवाई हल्ल्यातील स्क्वॉड्रन पदकांनी सन्मानित

गझियाबाद : बालाकोट हल्ल्यात सहभागी असलेले दोन स्क्वॉड्रन आणि भारतीय हवाई दलाच्या एका युनिटला मंगळवारी येथे पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भारतीय हवाई दल दिनाच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी ५१ स्क्वॉड्रन आणि ६०१ एक युनिट व नऊ स्क्वॉड्रन यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यातील सहभागाबद्दल पदके प्रदान करून सन्मानित केले.

बालाकोट हल्ल्यातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य वैमानिकांनी या वेळी हवाई कसरतींमध्ये भाग घेतला. पाकिस्तानसमवेत झालेल्या लढाईच्या वेळी वर्धमान यांनी शत्रुपक्षाचे विमान पाडले होते.

हवाई दल दिनानिमित्त भदौरिया यांनी बालाकोट हल्ल्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व स्क्वॉड्रननी असामान्य धैर्य, निर्धार आणि व्यावसायिकता दाखवून भारताचा विजय निश्चित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button