breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बालकांच्या मृत्यूची चाैकशी करा ; महापाैरांचे आयुक्तांना आदेश

पिंपरी – महापालिकेच्या इलेक्ट्रिक पोलचा शाॅक लागून निगडीत एका बालकाचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद बुधवारी (दि.27) महासभेत उमटले. विद्युत अधिका-याच्या चुकीच्या घटनामूळे मुलाचा मृ्त्यू झाला आहे. त्या कुटूंबाला आर्थिक मदत देवून घटनेची सखोल चाैकशी करा, अशी मागणी मनसेच्या नगरसेवक सचिन चिखले यांनी केली. दरम्यान, महापाैर नितीन काळजे यांनी संबंधित घटनेची चाैकशी करुन त्या कुटूंबियाला मदत करावी, अशा सूचना आयुक्तांना केली. 

हरीओम विनायक नराल (वय 9, रा. निगडी) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेचे पडसाद महासभेत बुधवारी उमटले. मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, हरिओम हा कुटुंबात एकुलता एक होता. महापालिकेच्या इलेक्ट्रिक पोलला हात लागल्याने शॉक बसून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबाला पालिकेने आर्थिक मदत करावी.

राष्ट्रवादीचे जावेद शेख म्हणाले, मुलाच्या दुर्देवी मृत्यूस महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. त्या अभियंत्यावर कडक कारवाई करावी, या घटनेने नराल कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्या कुटुंबाला आर्थिक मदत करुन प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जे दोषीं आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

याबाबत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच हरीओम नराल याच्या कुटुंबियांना नियमात बसत असल्यास आर्थिक मदत करण्याचे आदेश महापौर नितीन काळजे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button