breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारामतीत रिक्षा चालकाला कोरोनाची लागण, शहरात फिरल्याचं आलं समोर

शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. रुग्णाला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

श्रीरामनगर परिसरातील हा रुग्ण बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा त्रास वाढल्याने त्यास पुण्यातील ससूनला हलवण्यात आले होते. आता त्याला नायडू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. संबंधित रुग्ण हा रिक्षा चालक असल्याने तो बारामती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने रिक्षा फिरवली असावी. तसेच त्याच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची इतर नागरिकांना बाधा होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकर्तता बाळगावी, घरातच राहावे, घराबाहेर फिरू नये, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी स्वतःहून जनता कर्फ्यू लागू करून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button