breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारणराष्ट्रिय

एसटी’बाबत राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा: एकनाथ पवार

एसटी’बाबत राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा: एकनाथ पवार

  • तात्पुरत्या भाडेवाढवर आंदोलन करणारे संपावेळी कुठे होते?
  • महाविकास आघाडीच्या कुचकामी भूमिकेमुळे महामंडळाचे नुकसान

पिंपरी | प्रतिनिधी

सण- उत्सवात सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘एसटी’ महामंडळाने तात्पुरती भाडेवाढ केल्याने आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एसटीचे कामगार संपावर होते. ज्यावेळी ५४ दिवस एसटी बंद होती, त्यावेळी कुठे होते? असा सवाल भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी उपस्थित केला आहे.

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी ) भाडेवाढ केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने वल्लभनगर येथील एसटीच्या आगारामध्ये आंदोलन केले आणि ही भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली. यावर एकनाथ पवार यांनी टीका केली आहे.

एकनाथ पवार म्हणाले की, एसटीबाबत राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पीपणा असून, राष्ट्रवादीची कथनी आणि करणी यामध्ये फरक आहे. आता आंदोलन करणारी राष्ट्रवादी एसटी संपाच्या वेळेस कामगारांच्या आत्महत्या बघून गप्प होती. सत्ता असतानाही एसटी आणि कामगारांना वाऱ्यावर सोडले होते.

आज ज्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. त्याच आगारात संप सुरू होता. कामगार उपाशी होते त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते फिरकलेसुद्धा नाही. आपल्याच एसटी कामगार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची सामोपचाराची भूमिका घेतली गेली नाही किंवा एकही कार्यकर्ता, पदाधिकारी पुढे आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे.

**
… ही तर हंगामी भाडेवाढ : एकनाथ पवार

राष्ट्रवादीचे हे आंदोलन हास्यास्पद असल्याची टीका एकनाथ पवार यांनी केली. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि.२० व २१ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री बारानंतर नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येणार आहे. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यत राहील. दरवर्षीच अशी भाडेवाढ हंगामी स्वरूपात केली जाते. मात्र, राष्ट्रवादीचा याबाबत अभ्यास कमी पडत आहे का? असा उपरोधक सवालही एकनाथ पवार यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button