breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बापरे! उंच इमारतीच्या कड्यावरून सहज चालत जाते ही मुलगी; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका मुलीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत एक मुलगी टॉवरच्या वरच्या मजल्याच्या बाहेरील कडेवरुन अगदी सहज चालताना पहायला मिळतेय. ही मुलगी तिसऱ्यांदा हा प्रकार करत असल्याचं व्हिडिओमध्ये म्हटलंय. मुलीचे इमारतीच्या बाहेरील कडेवरुन चालणं अतिशय भयानक असून ती असं का करते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी असे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ समोरच्या इमारतीतील रहिवाशांनी शूट केला असून व्हिडिओ पाहुन सर्वजणच अचंबित झालेत.

दरम्यान हा प्रकार इमारतीतील रहिवाशांच्या लक्षात आला नाही का? ती मुलगी कोण? तिच्या कुटुंबाला या प्रकरणाबद्दल ठाऊक आहे का? असे अनेक प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात उपस्थित राहतात. तसंच हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट इमारतीमधील हा व्हिडिओ असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ Donald Quadros या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला असून ठाणे पोलिस, आमदार एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टॅग केलं आहे. तसंच हा लॉकाडाऊनचा परिणाम आहे असं या युजरने म्हटलं आहे. दरम्यान या मुलीचा शोध पोलिस लवकरच घेतील आणि या प्रकरणामागील सत्य आपल्या समोर येईल, अशी आशा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button