breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

#Jayshreeram…: अन्‌ पिंपरी-चिंचवडमधील कारसेवकांच्या ‘त्या’ आठवणी जाग्या झाल्या!

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त चिंचवडमधील राम मंदिर निनादले

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगेंकडून कारसेवकाचा सन्मान

पिंपरी । प्रतिनिधी

राम जन्मभूमी अयोध्या येथे बुधवारी राम मंदिर भूमिपूजन सोहळा झाला. देशभरातील रामभक्त, हिंदुंनी त्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा केला. गेल्या ५० वर्षांपासून मंदिराच्या उभारणीसाठी प्रतीक्षा करणारे कारसेवकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू पहायला मिळाले.

1990 मध्ये देशभरातील कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५०० कारसेवक अयोध्येला रवाना झाले होते. चिंचवडमधील ज्या मंदिरात त्यावेळी शिलान्यासाचा कार्यक्रम झाला. त्या मंदिरात राम नामाचा जयघोष झाला होता.

दरम्यान, देशभरातील राम भक्तांचे स्वप्न बुधवारी साकार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्या राम जन्मभूमीवर राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी चिंचवड गावातील त्याच राम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती केली. त्यावेळी कारसेवक हेमंतराव हरहरे यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या ५० वर्षांपासून हरहरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

‘ही’ रामराज्य आणि आत्मनिर्भर भारताची सुरवात : हेमंत हरहरे

कारसेवक हेमंत राव हरहरे म्हणाले की, माझ्यासारखे सुमारे ५०० कारसेवक त्यावेळी (1990) अयोध्येला गेले होते. त्यानंतर शहरातून शेकडो कारसेवक सहभागी झाले. श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा हा एका मंदिराच्या उभारणीचा कार्यक्रम नाही. सुमारे १८२० पासून लाखो लोकांनी या मंदिरासाठी बलिदान दिले आहे. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाची ही सुरूवात आहे. त्यामुळे असंख्य लोकांच्या डोळ्यांत आज आनंदाश्रू आहेत. ही केवळ राम मंदिराची पायाभरणी नसून, यातून देशामध्ये दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो या अर्थाला अनुसरून असे रामराज्य येणार असल्याचे देखील हरहरे यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button