breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बांधकाम विभागातील 13 कर्मचा-यांना आयुक्तांचा दणका, हलगर्जीपणा भोवला

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत बांधकामांचा अहवाल सादर करण्यात हलगर्जीपणा केल्याने बीट निरीक्षकांना आयुक्तांनी जोरदार धक्का दिला आहे. दहा बीट निरीक्षक आणि खातेनिहाय चौकशीस विलंब करणा-या तीन अशा एकूण 13 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला असून वेतनातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.

उपअभियंता लक्ष्मीकांत पंढरीनाथ कोल्हे, मीटर निरीक्षक सुर्यकांत शिवदास फड, आरोग्य निरीक्षक राकेश मंगलसिंग सौदाई, मीटर निरीक्षक सिद्धार्थ सदाशिव जोगदंड, मुख्य लिपिक रविंद्र वजीरसिंग भाट, आरोग्य निरीक्षक सचिन गुलाबराव जाधव, मुख्य लिपिक सदाशिव पंढरीनाथ सुभेदार, मीटर निरीक्षक योगेश सुर्यकांत रानवडे, आरोग्य निरीक्षक मकरंद मल्हार पानसे, भीमराव रामभाऊ कांबळे अशी दंडात्मत कारवाई केलेल्या बीट निरीक्षकांचे नावे आहेत. त्यांच्याकडे बीट निरीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार आहे. तर, खातेनिहाय चौकशी सुरु करण्यास दिरंगाई करणारे लिपिक अविनाश दौलत गायकवाड, वॉरलेस ऑपरेटर बी.के. पानमंद आणि विनायक भालचंद्र शेवतीकर यांच्यावर देखील प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.

शहरात अनधिकृत बांधकामे झाल्याचा बातम्या प्रसारमाध्यमामध्ये आल्या होत्या. त्याच्या अहवाल पाठविण्यास बीट निरिक्षकांनी अक्षम्य दिरंगाई केल्याचे सकृतदर्शनी आढळून आले होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. बीट निरीक्षकांनी खुलासे केले. परंतु, आयुक्तांना खुलासे संयुक्तिक वाटले नसल्याने खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यांची खातेनिहाय चौकशी रद्द करुन कामकाजातील हलगर्जीपणा, दुर्लक्ष केल्याबाबत प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. दंडाची रक्कम नजिकच्या मासिक वेतनातून वसूल करण्यात येणार आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. तसेच यापुढे कामकाजामध्ये कसूर केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button