breaking-newsपिंपरी / चिंचवड

बांधकाम कामगारांना युवक काँग्रेसचा मदतीचा हात

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

सध्या जगभर त्रासदायक ठरत असलेल्या कोरोना विषाणूच्या भयंकर प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत असलेल्या नागरी समस्याचें निराकरण करण्यासाठी सामाजिक व राजकीय संघटना कसोशीने काम करताना दिसत आहेत.

युवक काँग्रेस ने सुरू केलेल्या हेल्पलाईन द्वारे मिळत असलेल्या अडचणींचे निराकरण हि तीव्रतेने होताना दिसत आहे याचीच प्रचिती पिंपरी चिचंवडमध्ये पाहण्यास आली. हेल्पलाईन द्वारे मोशी-डुडुळगाव येथे सावतामाळी नगर येथील २० बिहारी कामगार अडचणीत व मदतीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती प्राप्त होताच युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे व पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव व काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मुन्साफभाई खान यांनी सदर कामगारांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली, चौकशी केली व त्यांना दिलासा देऊन आहे त्या ठिकाणीच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला.

युवक काँग्रेस कडून व स्थानिक स्वंयसेवी संस्थेकडून देण्यात देत असलेली मदत कामगारांनी तुर्तास पर्याप्त उपलब्ध असल्याने काही दिवसांनतंर संपर्क साधल्यावर देण्यास सांगितले व सध्याच्या बाहेरील परिस्थती बाबत देखील माहिती देऊन पदाधिकार-यांनी त्यांचे मनोबल वाढविले व भविष्यकालीन मदतीबाबत त्यांना विश्वास देण्यात आला. या भेटीबाबत कामगारांनी समाधान व आभार व्यक्त केले.

याप्रसंगी कपिल यादव,शामसुंदर यादव, उदय यादव, लल्लन यादव, उपेन्दर यादव आदींसह कामगार उपस्थित होते.

“शहरातील सर्वच, विशेषत: बाहेर राज्यातील व अडचणीत असलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता सरकारला अपेक्षित सहकार्य करण्याची गरज आहे, सरकारी यंत्रणा व नागरी सहकार्य या द्वारे परिस्थिती जलद गतीने आटोक्यात येईल, सरकारकडून दिल्या गेलेल्या सूचना काटेकोर पणे पाळाव्यात तसेच गरजूनां मदत किंवा सहकार्यासाठी युवक काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड हेल्पलाईन क्रं ९८६०१७७१७७, ८४८४०८३७३७, ९९७०९३३९३३ या वर संपर्क साधावा” असे आवाहन युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button