breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा’; अमोल कोल्हेंची मागणी

मुंबई : शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, अशी मागणी सातत्याने केली जाते. सावित्रीबाई फुले यांची आज १९३ वी जयंती साजरी केली जात आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, केवळ शिक्षण नाही तर विधवा पुर्नविवाह, तसेच समाजाच्या जागृतीसाठी अनेक मोठमोठे प्रकल्प असतील अशी अनेक महत्वाचं योगदान फुले दाम्पत्याने दिलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील याचा प्राधान्याने विचार करावा आणि फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

हेही वाचा   –    तीळ आणि गूळ हे एकत्र खाण्यामागे काय कारण आहे? वाचा सविस्तर..

महिलांच्याबाबतीत स्त्री शिक्षणाची एक ज्योत ही अत्यंत महत्वाची गोष्ट सावित्रीबाई फुले यांनी पेटवली आहे. महात्मा फुले यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा सामाजिक कार्यात मदत केली आहे. तसेच अनेकदा त्यांना सामाजिक प्रश्न सोडवतांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामाना करावा लागला आहे. त्याला अभिवादन केंद्र सरकारकडून हवा आहे आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button