breaking-newsआंतरराष्टीय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया अत्यवस्थ

ढाका – बांगला देशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया या सध्या अत्यवस्थ असून त्या स्वत: चालू देखील शकत नाहींत इतक्‍या गंभीर आजारी आहेत अशी माहिती त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या एका नेत्याने दिली. 72 वर्षीय खलिदा झिया या तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यांना एका भ्रष्टाचार प्रकरणात पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.

सध्या त्या आपल्या निवासस्थानीच असून पुर्वी निदान त्या आपल्या कुटुंबियांच्या मदतीने निवासस्थानाच्या आवारात चालताना तरी दिसायच्या पण त्यांना आता अंथरूणावरून उठणेही अशक्‍य बनले आहे असे बांगला देश नॅशनल पार्टीचे नेते मिर्झा फकरूल इस्लाम यांनी म्हटले आहे. 72 वर्षीय माजी पंतप्रधनांना तातडीने वैद्यकीय उपचार द्यावेत आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जिथे हवे तेथे उपचार घेऊ दिले जावेत अशी मागणी इस्लाम यांनी सरकारकडे केली आहे. त्यांना दोनशे वर्ष जुन्या कारागृहात ठेवण्यात आले होते.

तेथे त्यांची प्रकृती ढासळली. त्यांचे आजारपण लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे. बांगलादेशात या वर्षी डिसेंबर महिन्यात निवडणूका होणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये त्या सहभागी होतील की नाही या विषयी शंका आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक चिंतेत पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button