breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बहुचर्चित ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री; ‘या’ शहरात असेल कार्यालय

नवी दिल्ली – दिग्गज उद्योगपती एनल मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीने ८ जानेवारीला अधिकृतपणे बेंगळुरू या शहरात आपल्या कार्यालयाची नोंदणी केली आहे. कंपनी भारतात लग्झरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन करेल. त्यामुळे भारतीय रस्त्यांवर लवकरच टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार धावणार आहे.

टेस्लाने त्यांचे कार्यालय सुरू करण्यासाठी भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरुची निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात कंपनीचे कार्यालय असेल. कंपनीने भारतातील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांचीदेखील नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेंस्टीन यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतात टेस्लाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, २०२१ मध्ये कंपनी भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, कंपनी पुढील वर्षीपासून भारतात आपले कामकाज सुरू करणार आहे. भारत पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक उत्पादन देश म्हणून समोर येणार आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी टेस्लाचं कर्नाटकात स्वागत केले. ‘मी एलन मस्क आणि टेस्लाचे भारतात व कर्नाटकात स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासाचे नेतृत्त्व करेल’, असे येडियुरप्पा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button