breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जगभरात 85 लाखांहून अधिक कोरोना बाधित

मुंबई | जगभरात कोरोना व्हायरसने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. दरदिवशी नवे कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनामुळे 85 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने जवळपास चार लाख 55 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. आतापर्यंत 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्म फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक झाली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

ब्राझील, रशिया, स्पेन, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे केस आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.20 लाखांहून अधिक झाला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे, तर भारताचा समावेश कोरोना बाधित टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button