breaking-newsराष्ट्रिय

बलात्कारातील 17 आरोपींना कोर्टाच्या आवारात वकिलांकडून मारहाण

चेन्नई – अल्पवयीन कर्णबधीर मुलीवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 17 आरोपींना आज कोर्टाच्या आवारातच जमावाने बेदम मारहाण केली. सुमारे 50 जणांच्या जमावामध्ये बहुसंख्य वकीलच होते. या घटनेमुळे कोर्टाच्या परिसरामध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. मोठ्या मुश्‍कीलीने या सर्व आरोपींना जमावापासून दूर करण्यात पोलिसांना यश आले.

चेन्नईमधील पुरस्वल्कम भागातील अपार्टमेंटमध्ये हे बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले होते. या अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षक, लीफ्टमन, प्लंबर आणि किरकोळ कामे करणाऱ्या काही व्यक्‍तींनी या अल्पवयीन मुलीवर गेल्या 7 महिन्यांपासून बलात्कार केला होता. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या या मुलीला इंजेक्‍शन, गुंगीचे औषध घातलेली चॉकलेट आणि सॉफ्ट ड्रिंक देत असत. त्यामुळे या मुलीला गुंगी येत असे. तिच्यावर बलात्कार करण्याबरोबर अश्‍लील व्हिडीओ चित्रीकरणही केले जात असे.

या 17 आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्या सर्वांना कोठडी सुनावल्यानंतर परत जात असताना वकिलांच्या जमावाने या आरोपींना घेरले आणि बेदम मारहाण केली. यापैकी 8 जणांना पहिल्या मजल्यावरील कुटुंब न्यायालयात सुरक्षितपणे नेण्यात आले. तर उर्वरित 9 जणांना पुन्हा महिला न्यायालयात नेल्यावरच त्यांची सुटका होऊ शकली. या सर्व आरोपींचे वकिलपत्र न घेण्याचा निर्णय वकिलांच्या संघटनेने घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button