breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बलात्काराचे अश्‍लील चित्रण व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीकडून घेतले अडीच लाख

  • खडक पोलिसांनी केली तरूणाला अटक 

  • विशेष न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याचे मोबाईलमध्ये केलेले अश्‍लील चित्रण व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात खडक पोलिसांनी 21 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी दिला आहे.
योगेश मारूती गायकवाड (वय 21, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत काशेवाडी भागात राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 ऑक्‍टोबर 2017 ते 29 जून 2018 या कालावधीत हरकारनगर येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घडला. योगेश याने पीडितेवर बलात्कार केला. याबाबत अश्‍लील चित्रण व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर जून 2018 मध्ये माहराण करत तिला पुन्हा आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. शरीर संबंध ठेवण्याबाबत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी योगेश याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी तिच्याकडून घेतलेले अडीच लाख रुपये जप्त करण्यासाठी आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button