breaking-newsराष्ट्रिय

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने केली भाजपा नेत्याची हत्या

गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार जयंती भानुशाली यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. राजकीय वैमनस्यातून भाजपाचे स्थानिक नेते छाबिल पटेल यांनी एका महिलेच्या मदतीने जयंती भानुशाली यांच्या हत्येचा कट रचला. भानुशाली यांची हत्या करण्यासाठी पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या दोन तरुणांना सुपारी देण्यात आली होती.

भाजपाचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची ८ जानेवारी रोजी धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणाने गुजरातमधील भाजपा सरकारवर टीका देखील झाली. या गुन्ह्याचा तपास राज्याच्या सीआयडी पथकाकडे सोपवण्यात आला होता. अखेर तपास पथकाला आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. गुजरातमधील अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) अजय तोमर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. ‘छाबिल पटेल, सुरजित परदेशी उर्फ भाऊ आणि एका महिलेने भानुशालीच्या हत्येचा कट रचला’, असे पोलिसांनी सांगितले.

जयंती भानुशाली आणि छाबिल पटेल हे एकाच पक्षात असले तरी ते एकमेकांचे कट्टर विरोधक होते. तर या प्रकरणी अटक झालेल्या महिलेचाही भानुशाली यांच्याशी वाद होता. तिने जयंती भानुशाली यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर भानुशाली यांच्या पुतण्याने त्या महिलेविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी त्याने फसवणुकीप्रकरणीही महिलेविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. यामुळे महिला १० जून ते ३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत तुरुंगात होती. त्या महिलेला तुरुंगातून बाहेर काढण्यात छाबिल आणि परदेशी या दोघांनी मदत केली. तुरुंगातून बाहेर आल्यावर ती महिला, छाबिल पटेल आणि परदेशी या तिघांनी भानुशाली यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

ती महिला परदेशीसह पुण्यातही आली. परदेशी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या शशिकांत कांबळे आणि अश्रफ अन्वर शेख या दोघांना भानुशाली यांच्या हत्येची सुपारी दिली.

शार्प शूटर्स ३१ डिसेंबर रोजी भानुशाली यांची हत्या करण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचले. छाबिल पटेल यांच्या भूजमधील फार्म हाऊसवर दोघे थांबले होते. त्या दोघांनी भानुशाली यांच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. शेवटी ८ जानेवारी रोजी दोघांनी भानुशाली यांच्या हत्या करण्यासाठी सयाजी नगरी एक्स्प्रेस पकडली. भानुशालीही याच ट्रेनमधून प्रवास करत होते. या दोघांनी भानुशाली यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ट्रेनची चेन खेचली आणि ट्रेन थांबताच पळ काढला.  हत्येपूर्वीच म्हणजेच २ जानेवारी रोजी छाबिल पटेल हा मस्कतला पळून गेला असून सध्या तो कुठे आहे, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button