breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बदनामीला घाबरुन अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटूंबाने पोलीसांकडे तक्रार देण्यास नकार

– अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेवर वायसीेएममध्ये उपचार

पिंपरी (महा ई न्यूज ) – एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करुन गर्भ धारण होईपर्यंत तिला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर पीडितेच्या कुटूंबाने तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने एका मृत बाळाला जन्म दिला. मात्र या प्रकरणी पीडित आणि तिच्या कुटुंबाने पोलीसात तक्रार दाखल केली नाही. पिंपरी-चिंचवड वूमन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीने या प्रकरणी पीडित मुलीला आणि तिच्या आईला समजावले मात्र त्यांनी पोलीस तक्रार देण्यास साफ नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथे राहणारी पीडित अल्पवयीन तरुणीवर एका नराधमाने डांबून ठेवून बलात्कार केला. तसेच ती गर्भवती असल्याचे समजताच तिला तिच्या घरी सोडून दिले. त्यानंतर पीडितेच्या कुटूंबीयांनी तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तिने एका मृत बाळाला जन्म दिला. पीडितेच्या कुटूंबीयांनी बलात्काराची तक्रार पोलिसात केली नाही. तसेच मृत बाळाची देखील परस्पर विल्लेवाट लावली. या दरम्यान पिंपरी-चिंचवड वूमन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीला याबाबत माहिती मिळाली त्यांनी पीडित तरुणी आणि तिच्या घरच्यांना पोलीसात तक्रार देण्यासाठी सांगितले. मात्र घाबरलेल्या कुटूंबाने तक्रार देण्यास नकार दिला.

यामुळे या समितीतील महिलांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पाटील यांनी घोडेगाव पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर घोडेगाव पोलिसांनी वायसीएममध्ये जाऊन पीडितेच्या कुटूंबीयांना आणि पीडितेला समजावले मात्र तरी सुध्दा भेदरलेल्या कुटूंबीयांनी तक्रार देण्यास साफ नकार दिली आहे. यामुळे हे कुटुंब एकतर आरोपीला घाबरुन तक्रार देत नाहीए किंवा समाजात होणाऱ्या बदनामीला घाबरुन तक्रार देत नाहीए असे बोलले जात आहे. या घटनेमुळे पेचाची परिस्थिती निर्माण झाली आहे. घोडेगाव पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button