breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पोटनिवडणूक निकाल : मध्य प्रदेशात कमळ की कमलनाथ?

भोपाळ – बिहारसह मध्य प्रदेशातही आज निवडणूक मतमोजणीची रणधुमाळी आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच मध्य प्रदेशातही २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. या राज्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे अल्पमतात आलेले काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. तर पक्षांतरामुळे आमदारकी गेल्याने मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

१९ जिल्ह्यातील विधानसभेच्या २८ जागांसाठी मध्य प्रदेशात मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल शिवराज सिंह चौहान सरकारचे भवितव्य निश्चित करणार आहे तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचा राज्याच्या राजकारणातील प्रभावही निश्चित होणार आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार, त्यावरून सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे.

मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार २८ पैकी १८ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्याखालोखाल काँग्रेस ८ तर बसपाचे उमेदवार २ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात सरकार राखण्यासाठी भाजपाला फक्त ८ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे १०७ आमदार आहेत तर काँग्रेसचे संख्याबळ ८७ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button