breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘सनबर्न क्लासिक’ला हायकोर्टाचा दणका; बांधकाम हटविण्याचे आदेश

पणजी | महाईन्यूज

वागातोर येथे येत्या २७ ते २९ या दरम्यान होऊ घातलेल्या सनबर्न क्लासिकच्या इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल पार्टीला मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दणका दिला आहे. वागातोर येथे पार्टीसाठी उभारलेले हंगामी बांधकाम काढून टाकण्याचा आदेश कोर्टाने दिला असून पंचायत तसेच अन्य संबंधित यंत्रणांकडून ना हरकत दाखला घेतल्यानंतरच बांधकाम केले जावे असे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने बांधकामाला स्थगिती दिली होती, मात्र ती डावलून कंपनीने हंगामी बांधकाम चालविलेले होते. २ कोटी २५ लाख रुपये आगाऊ शुल्क भरण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत.

ईडीएमचे आयोजक सनबर्न क्लासिकची कडक शब्दात कानउघाडणी करताना स्थगिती डावलून बांधकाम केलेच कसे?, असा संतप्त सवाल हायकोर्टाने केला आहे. उभारण्यात आलेले सर्व बांधकाम आधी हटवा आणि त्यानंतर ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करा आणि आयोजकांनी सर्व जमीन पूर्ववत करून दिल्याची खातरजमा केल्यानंतरच स्थानिक पंचायतीने परवाना द्यावा, असे कोर्टाने बजावलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button