breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘फ्लिपकार्ट’चा सह-संस्थापक सचिन बन्सलवर हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याची तक्रार दाखलं

ई-कॉमर्स वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चा सह-संस्थापक सचिन बन्सल पुन्हा एकदा वादात अडकलाय. सचिनवर त्याची पत्नी प्रिया हिनं घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. प्रिया बन्सल हिनं बंगळुरूच्या कोरमंगला पोलीस स्टेशनमध्ये सचिनविरुद्ध हुंड्याची मागणी करत छळ केल्याची तक्रार दाखल केलीय. या एफआयआरमध्ये चार जणांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. सचिन बन्सल, त्याचे वडील सतप्रकाश अग्रवाल, आई किरण बन्सल आणि भाऊ नितीन बन्सल यांच्याविरुद्धही प्रियानं छळाची तक्रार दाखल केलीय.

सचिन आणि प्रिया यांचा विवाह २००८ मध्ये पार पडला होता. लग्नानंतर सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी लगेचच हुंड्याची मागणी सुरू केली होती, असं प्रियानं आपल्या तक्रारीत म्हटलंय.आपल्या लग्नाकरीता वडिलांनी ५० लाखांचा खर्च केला होता तसंच सचिनला ११ लाख रुपये रोख दिले होते, असंही प्रियानं आपल्या तक्रारीत म्हटलंय.

३५ वर्षीय प्रियानं २८ फेब्रुवारी रोजी ही तक्रार पोलिसांत दाखल केलीय. उल्लेखनीय म्हणजे, सचिन बन्सल याची आई किरण यांनी काही आठवड्यांपूर्वी आपल्या सुनेविरुद्ध एक एफआयआर दाखल केल होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button