breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

फेसबुकचा नफा 7 टक्के वाढला

कॅलिफोर्निया | फेसबुकला ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ७३४ कोटी डॉलर(५२,५२० कोटी रुपये) नफा झाला आहे. हा २०१८ च्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत ७% जास्त आहे. त्या वेळी कंपनीला ६८८ कोटी डॉलर(४९,१८२ कोटी रुपये)चा फायदा झाला होता. दुसरीकडे, या तिमाहीत कंपनीला २१०८ कोटी डॉलर(१.५० लाख कोटी रुपये)चा महसूल मिळाला आहे, हा २०१८ च्या या तिमाहीपेक्षा २५% जास्त आहे. २०१८ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीला १६९१ कोटी डॉलर(१.२० लाख कोटी रुपये) महसूल मिळाला होता.

असे असले तरी, ही सलग चौथी तिमाही आहे, जेव्हा कंपनीच्या महसुलात ३०% पेक्षा कमी वृद्धी झाली आहे. फेसबुकने तिमाही निकालासह वर्षभराचे निकालही जारी केले. २०१९ मध्ये कंपनीला १८४८ कोटी डॉलर(१.३२ लाख कोटी रुपये)ची कमाई केली होती. हे २०१८ च्या तुलनेत १६% कमी आहे. २०१८ मध्ये कंपनीला २२११ कोटी डॉलर(१.५८ लाख कोटी रुपये)चा नफा झाला होता.

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने ५५ कोटी डॉलर(३,९३० कोटी रुपये) कायदेशीर खर्चासाठी राखून ठेवले आहेत. फेसबुकविरोधात लाखो युजर्सचा डेटा परवानगीशिवाय स्टोअर करण्याचा खटला सुरू आहे.

फेसबुकची सेवा म्हणजे फेसबुक, व्हाॅट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा वापर करणारे युजरही डिसेंबर तिमाहीत ११% वाढले. फेसबुक फॅमिलीच्या कोणत्याही सेवेस दिवसात कमीत कमी एक वेळा वापर करणाऱ्या युजर्सची संख्या २२६ कोटीवर पोहोचली आहे. त्यांना फॅमिली डेली अॅक्टिव्ह युजर्स लोक म्हटले जाते.

ऑक्टोबर-डिसेंबर 2019 : युजर (वाढ)

  • डेली अक्टिव्ह युजर : 166 कोटी (9%)
  • मंथली अक्टिव्ह युजर : 250 कोटी (8%)
  • फॅमिली डेली अक्टिव्ह पीपल : 226 कोटी (11%)
  • फॅमिली मंथली अक्टिव्ह पीपल : 289 कोटी (9%)

2019 च्या प्रत्येक तिमाहीची वृद्धी, तिमाही : महसूल : वृद्धी

  • पहिली(जानेवारी-मार्च) : 1.07 : 26%
  • दुसरी(एप्रिल-जून) : 1.20 : 28%
  • तिसरी(जुलै-सप्टेंबर) : 1.26 : 29%
  • चौथी(ऑक्टोबर-डिसेंबर) : 1.50 : 25%
  • (महसूल लाख कोटी रुपयांत)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button