breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : डेन्मार्कची पेरूवर 1-0 ने मात

सरान्स्क – फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत डेन्मार्क आणि पेरू यांच्यात अटीतटीची लढत झाली. डेन्मार्कच्या संघाने पेरूला 1-0 ने हरवले. युसुफ युरारे पोल्सन याने 59 व्या मिनिटाला गोल करुन पेरूवर शानदार विजय मिळवला.

पेरूचा संघ 36 वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेस पात्र ठरुन विजयासाठी मैदानात उतरला होता. मात्र, त्यांना विजय मिळवण्यात यश आले नाही. फिफाच्या जागतिक क्रमवारीत पेरू 11 व्या तर डेन्मार्क 12 व्या स्थानी विराजमान आहेत. पेरुच्या क्रिस्टन क्‍युएवाने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावण्याच्या चुकीबरोबरच पेरूला पराभवाच्या धक्‍क्‍यालाही सामोरे जावे लागले. सामन्यात डेन्मार्कच्या फॉरवर्ड युरारे याने पेरूच्या क्‍युएवा याला बॉक्‍समध्ये पाडले होते. यामुळे व्हिडीओ सहायक रेफरीच्या माध्यमातून क्‍युएवाला पेनल्टी मिळाली होती. मात्र, मिळालेली ही पेनल्टी क्‍युएवा याने वाया घालवली.

डेन्मार्कच्या युसुफ युरारेने दुसऱ्या हाफमध्ये 59 व्या मिनिटाला पेरूच्या गोल रक्षकाला चकवा देत बॉल थेट गोलपोस्टमध्ये पोहोचवून 1-0 अशी आघाडी घेऊन विजय आपल्या नावे केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button