breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Whatsapp चं नवीन ‘चॅनेल फीचर’ सादर; युजर्सना सुरू करता येणार स्वतःच चॅनल

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी आपल्या यूजर्सना नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देतं. यूजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा या उद्देशाने हे फीचर्स कंपनी उपलब्ध करून देत असते. त्याच उद्देशाने आता व्हॉट्सअ‍ॅपने चॅनल्स हे फीचर लाँच केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर ब्रॉडकास्ट मेसेजचं अपडेटेड स्वरूप असून यासाठी ‘अपडेट’ नावाचा वेगळा टॅब देण्यात येणार आहे. याठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांचे स्टेटस आणि तुम्ही फॉलो करत असलेले चॅनल्स दिसतील.

हेही वाचा – Chinchwad : श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा शनिवारपासून

या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॅनल्स फॉलो करू शकाल. एखादी स्पोर्ट्स टीम, स्थानिक अधिकारी, ट्यूशन क्लासेस किंवा अन्य गोष्टींविषयी तयार करण्यात आलेले चॅनल्स तुम्ही पाहू शकणार आहात. तुम्ही एखाद्या चॅनलला फॉलो केलं, तरीही त्याच्या अ‍ॅडमिनला किंवा अन्य फॉलोवर्सना तुमचा नंबर दिसणार नाही. विशेष म्हणजे तुम्ही या माध्यमातून जगभरातील चॅनल्स फॉलो करू शकाल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button