breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

फडणवीस यांच्या वाढदिवशी बॅनरबाजी गंभीर कारवाई करणार असल्याचा इशारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या म्हणजे 22 जुलै रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त कोणतीही बॅनरबाजी न करण्याचं आवाहन भाजपनं केलं आहे. भाजप प्रदेश कार्यालयातून तसं पत्रकच काढण्यात आलं आहे.यंदा करोनाचं संकट असल्याने फडणवीस यांच्या वाढदिवशी बॅनरबाजी न करण्याचं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलं आहे. तसेच कुणीही वाढदिवसानिमित्त बॅनर्स, होर्डिंग्ज लावल्यास गंभीर दखल घेतली जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यालयातून एक पत्रक काढून भाजपच्या कार्यकर्त्यांना हे आवाहन करण्यात आलं आहे. उद्या २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. मात्र, यंदा राज्यात करोनाचं गंभीर संकट असल्याने वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचं आवाहन पक्षाने केलं आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशी शुभेच्छा बॅनर्स, होर्डिंग्ज लावू नका. तसेच वर्तमानपत्रे तसेच टीव्हीवरही वाढदिवसाच्या जाहिराती दिल्या जाणार नाहीत. वाढदिवसाला कोणत्याही प्रकारे उत्सवी स्वरुप देण्याचा प्रयत्न होता कामा नये. तसं केल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा देतानाच दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे. तसेच करोनाचं संकट असल्याने राज्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आणि सेवाकार्यात योगदान देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

दरम्यान, काल तब्बल ८ हजार २४० नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ३ लाख १८ हजार ६९५ इतकी झाली आहे. त्यात पुणे महापालिका क्षेत्रात ६५ हजार २८६ तर मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख २ हजार ४२३ रुग्णांची संख्या झाली आहे. राज्यात काल दिवसभरात १७६ करोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं करोनाबळींचा आकडा आता १२ हजार ०३० पर्यंत पोहोचला आहे. राज्याचा मृत्यूदर ३.७७ इतका आहे. सध्या राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ जणं होम क्वारंटाइन आहेत तर ४५ हजार ४३४ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगर मनपा-६,वसई-विरार मनपा-२, रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४,औरंगाबाद मनपा-३, जालना-१,लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button