breaking-newsराष्ट्रिय

प्लाझा थेरपी कोरोना रुग्णाला वाचवू शकत नाही – आयसीएमआर

  • आयसीएमआरने केलेल्या संशोधनात असे स्पष्ट झाले

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा हाहाकार कायम आहे. देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांना कोरोनाच्या लढाईत अनेक ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातोय. तसेच कोरोनामुक्त झालेल्यांना आपण प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सुद्दा करतोय. त्यामुळे देशातील कोरोनाच्या काळात आशादायक चित्रं निर्माण झाले होते. मात्र, ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ अर्थात आयसीएमआरने कोरोना उपचारावर मदत ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचे दावे फेटाळले आहेत.

आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपीवर सखोल अभ्यास केले त्यात त्यांच्या अशा लक्षात आले की, कोरोनाच्या उपचारावर प्लाझ्मा जीवदान ठरत नाही. तसेच जर एखाद्या कोरोना रुग्णाला उपचारादरम्यान प्लाझ्मा दिला तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं आयसीएमआरच्या संशोधनात समोर आलं आहे. या संशोधनात “इंटरवेन्शन” आणि “कंट्रोल” असे दोन गट तयार करण्यात आले. त्यात इंटरवेन्शन ग्रुपमध्ये 235 जणांपैकी काही रुग्णांना प्लाझा देण्यात आला. तर दुसऱ्या गटातील म्हणजेच कंट्रोल गटामध्ये 229 जणांना प्लाझाच्या ऐवजी चांगले औषधौपचार करण्यात आले.

त्यानंतर त्या दोन्ही ग्रुपचा 28 दिवस अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये प्लाझा देण्यात आलेल्या 34 रुग्णांपैकी 13.6 टक्के रुग्ण दगावल्याचं स्पष्ट झालं. तर दुसऱ्या गटातील 31 रुग्णांना प्लाझा देण्यात आलेला नव्हता तरी सुद्धा त्यांचाही मृत्यु झाल्याचं स्पष्ट झालं. संशोधनानुसार, प्लाझ्मा थेरपीचा वापर श्वासोच्छवास घेताना समस्या किंवा थकवा कमी करण्यासाठी होत असल्याचं स्पष्ट झालं. मात्र ताप किंवा खोकला यांसारख्या लक्षणांवर मात्र प्लाझ्मा थेरपीचा वापर होऊ शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button