breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईत लसीकरण बंद

मुंबई – कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे देशभरात लसीकरण मोहीमेने वेग धरला आहे. मात्र अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर अनेकदा लसीकरण बंद ठेवण्याची वेळ येतेय. आज (बुधवारी) दिनांक 4 ऑगस्ट, 2021 रोजीही पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.

‘कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (बुधवार) दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे’, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली होती. तसेच ‘लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे’, असे आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 288 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच सध्या 4,616 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button